यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ / संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान" देण्यात येतो. दिनांक ०१ जुलै २०२६ ते २० ऑगस्ट २०२६ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यात यावा.
आपल्या कार्यकर्तृत्वातून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्था स्थापन करतात. आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करतात. या संघाचा किंवा संस्थेचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे.
या सन्मानाचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र आणि सन्मानाची रक्कम असे राहील. हा सन्मान सोहळा ऑक्टोबर मध्ये मुंबई येथे संपन्न होईल.
नियमावली -
- १. अर्जदार ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्था हे महाराष्ट्र राज्यातील असावेत. संपूर्ण राज्यभरातून अर्ज स्वीकारले जातील.
- २. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधी व न्याय व पर्यावरण या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे संघ किंवा संस्था अर्ज करू शकतात. (कोणत्याही एका क्षेत्रासाठी अर्ज करता येईल.)
- ३. संघ किंवा संस्था (Societies Registration Act, 1860 or Bombay Public Trusts Act, 1950) रजिस्टर असायला हवी.
- ४. संघ किंवा संस्था हा भारतीय संविधानाला अनुसरून कार्यरत असणारा पाहिजे.
- ५. संघ किंवा संस्था मागील पाच वर्षे सातत्याने उपक्रम राबवित असायला हवी.
- ६. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो केवळ दिलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे (पोस्टाने) पर्यायी (कुरिअरने) पाठविणे आवश्यक आहे. (ई-मेल, WhatsApp अथवा इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. कृपया नोंद घ्यावे हि विनंती.)
- ७. निवड समितीचे निर्णय अंतिम राहतील.




