यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान" देण्यात येतो. दिनांक ०१ जुलै २०२६ ते २० ऑगस्ट २०२६ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यात यावा.
आपल्या कार्यकर्तृत्वातून सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या सन्मानाचा उद्देश आहे. हा सन्मान वैयक्तिकरित्या देण्यात येणार आहे.
या सन्मानासाठी दोन महिला, दोन पुरुष, एक ट्रान्सजेंडर किंवा दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल. सन्मानाचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र आणि सन्मानाची रक्कम असे राहील. हा सन्मान सोहळा ऑक्टोबर मध्ये मुंबई येथे संपन्न होईल.नियमावली
- १. यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक सन्मानासाठी संपूर्ण राज्यभरातून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- २. यापूर्वी सदर सन्मानाने गौरविण्यात आलेल्या अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अशा अर्जदारांनी पुनश्च अर्ज करू नये, हि नम्र विनंती.
- ३. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधी व न्याय व पर्यावरण या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व्यक्ती अर्ज करू शकतात. (कोणत्याही एका क्षेत्रासाठी अर्ज करता येईल)
- ४. अर्जदाराचे वय ६५ वर्ष व त्यापुढे असावे. (तृतीयपंथी व्यक्ती यांच्यासाठी वय वर्ष ५० व त्याच्या पुढे)
- ५. वय वर्ष ६० नंतर केलेल्या कार्यास प्राधान्य दिले जाईल. (तृतीयपंथी व्यक्ती यांच्यासाठी वरील प्रमाणे)
- ६. सन्मानासाठी दोन महिला, दोन पुरुष व एक तृतीयपंथी व्यक्ती आणि एक दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल.
- ७. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो केवळ दिलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे (पोस्टाने) पर्यायी (कुरिअरने) पाठविणे आवश्यक आहे. (ई-मेल, WhatsApp अथवा इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. कृपया नोंद घ्यावे हि विनंती.)
- ८. निवड समितीचे निर्णय अंतिम राहतील.




