यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने युवांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पुरस्कार दिले जातात. याचाच एक भाग म्हणजे सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन या क्षेत्रांतील निवडक गुणवंत युवांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रुपये २१ हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

युवा उद्योजक पुरस्कार

औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या युवांना 'युवा उद्योजक पुरस्कार' दिला जातो. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून यशस्वी व्यवसाय करणार्‍या व समाजात आपला आदर्श निर्माण करणाऱ्या युवा व्यक्तींचा गौरव या पुरस्काराने केला जातो. महाराष्ट्रात उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

युवा उद्योजक पुरस्कार अर्ज दाखल करा

साहित्य युवा पुरस्कार

साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी युवांना दिला जाणारा पुरस्कार 'साहित्य युवा पुरस्कार' या नावाने ओळखला जातो. साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या युवांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. मराठी भाषा व साहित्‍य विकासासाठी लेखन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

साहित्य युवा पुरस्कार अर्ज दाखल करा

सामाजिक युवा पुरस्कार

सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी युवांना दिला जाणारा पुरस्कार 'सामाजिक युवा पुरस्कार' या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करणार्‍या युवांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सामाजिक युवा पुरस्कार अर्ज दाखल करा

क्रीडा युवा पुरस्कार

क्रिडा क्षेत्रातील योगदानासाठी युवांना दिला जाणारा पुरस्कार 'क्रीडा युवा पुरस्कार' या नावाने ओळखला जातो.महाराष्ट्र राज्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

क्रीडा युवा पुरस्कार अर्ज दाखल करा

रंगमंचीय कलाविष्कार युवा पुरस्कार

रंगमंचीय कलाविष्कार क्षेत्रातील योगदानासाठी युवांना दिला जाणारा पुरस्कार 'रंगमंचीय कलाविष्कार युवा पुरस्कार' या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रातील रंगमंचीय कलाविष्कार क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करणार्‍या युवांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रंगमंचीय कलाविष्कार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रंगमंचीय कलाविष्कार युवा पुरस्कार अर्ज दाखल करा

पत्रकारिता युवा पुरस्कार

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी युवांना दिला जाणारा पुरस्कार ' युवा पत्रकार पुरस्कार' या नावाने ओळखला जातो. आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजात आपला आदर्श निर्माण करणाऱ्या युवा व्यक्तींचा गौरव या पुरस्काराने केला जातो. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

पत्रकारिता युवा पुरस्कार अर्ज दाखल करा

युवा इनोव्हेटर पुरस्कार

नव्या उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या युवांना दिला जाणारा पुरस्कार ' युवा इनोव्हेटर पुरस्कार' या नावाने ओळखला जातो. आपल्या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात आपला आदर्श निर्माण करणाऱ्या युवा व्यक्तींचा गौरव या पुरस्काराने केला जातो. एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

युवा इनोव्हेटर पुरस्कार अर्ज दाखल करा

महत्वपूर्ण वेळापत्रक

या सर्व पुरस्कारांसाठी दि. १८ ऑक्टोबर पासून अर्ज मागविण्यात येणार असून याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.

पुरस्काराचे स्वरूप

रुपये २१ हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्येक पुरस्काराच्या माहितीमध्ये दिलेल्या गुगल फॉर्मला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी :
संपर्क: संतोष मेकाले - ९८६०७४०५६९ / मनीषा खिल्लारे -९०२२७१६९१३
ईमेल: हा ईमेल पत्ता स्पॅमबॉट्सपासून संरक्षित केला जात आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे.
वेबसाईट: www.chavancentre.org