यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता ‘संविधान प्रश्नमंजुषा’ आयोजित करण्यात आली आहे. ही प्रश्नमंजुषा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात येईल. इयत्ता ५ ते १० वी हा शालेय गट, इयत्ता अकरावीपासून पुढील सर्व विद्यार्थी महाविद्यालयीन गटामध्ये सहभागी होऊ शकतात आणि शिक्षक,पालक,अभ्यासक व इतर सर्व नागरिक खुल्या गटात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक गटास पुढील घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातील.

१) शालेय गट- इयत्ता ५ ते १० वी

-संविधान म्हणजे काय?
-संविधान सभा आणि संविधान निर्मिती प्रक्रिया,
-संविधानाची मूलभूत चौकट आणि प्रास्ताविक,
-मुलभूत हक्क आणि कर्तव्ये

२) महाविद्यालयीन गट - इयत्ता अकरावीपासून पुढे

-भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी,
-संविधान निर्मिती प्रक्रिया,
-भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ,
-मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे,
-संविधान दुरुस्ती प्रक्रिया.

३) खुला गट - शिक्षक,पालक,अभ्यासक व इतर सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात.

-संविधान निर्मितीमागील पार्श्वभूमी,
-संविधान निर्मिती प्रक्रिया,
-संविधानातील भाग व महत्त्वाची कलमे यांच्यातून प्रतीत होणारी लोकशाही मूल्ये,
-भारतीय संघराज्य व्यवस्था राज्यशासन आणि प्रशासन (प्रामुख्याने महाराष्ट्राच्या संदर्भात) निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्ष,
-घटनादुरुस्ती प्रकिया व महत्वाच्या घटनादुरुस्ती.

 

प्रश्नमंजुषेविषयी सूचना:

१) परीक्षेसाठीची अधिकृत लिंक निर्धारित वेळेपासून १२ तास खुली राहील.
२) उपरोक्त विषयावर प्रत्येकी १ गुणाचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. गट निहाय प्रश्न संख्या पुढीलप्रमाणे असेल. शालेय आणि महाविद्यालयीन गट - एकूण १० प्रश्न खुला गट - एकूण १५ प्रश्न
३) प्रश्नपत्रिका दोन भागात असेल. पहिल्या भागात नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, गट इत्यादी माहिती भरल्यानंतर Next बटन क्लिक केले की दुसरा भाग दिसेल. या भागात प्रश्नपत्रिका दिलेली असून सर्व प्रश्न सोडवल्यानंतर Submit हे बटन क्लिक करावे.
४) ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी फक्त एकच संधी दिली आहे त्यामुळे उत्तराची खात्री करूनच Submit बटन दाबावे.
५) Submit बटन क्लिक केल्यावर ‘आपला प्रतिसाद नोंदवला गेला आहे’ हा संदेश दिसेल त्याचबरोबर खाली View Score हे बटन दिसेल.
६) एक पेक्षा अधिक प्रतिसाद प्राप्त झाल्यास सर्वात आधी दिलेल्या प्रतिसादाचे गुण ग्राह्य धरले जातील.
७) गुण समान झाले तर ज्या स्पर्धकांनी पेपर आधी Submit केला अशांचा प्राधान्याने विचार करून विजेते निश्चित केले जातील.
८) प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ईमेलवर मिळेल. त्यासाठी ० ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. १५ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रमाणपत्र न मिळाल्यास संजना पवार - 8291416216 यांच्याशी संपर्क साधावा.
९) प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गुगल फॉर्ममध्ये अचूक ईमेल लिहिणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र पाठवण्याची प्रक्रिया स्वयंचलित असल्यामुळे ईमेलमध्ये त्रुटी असल्यास सर्टिफिकेट मिळणार नाही. याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
१०) या प्रश्नमंजुषेतील प्रथम तीन स्पर्धकांची नावे मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी शिक्षण विकास मंचाच्या सर्व व्हाट्सअप ग्रुपमध्ये आणि फेसबुक ग्रुपवर प्रसारित केली जातील. विजेत्यांना ग्रंथभेट व गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.

प्रश्नमंजुषा लिंक रविवार, दि २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता ओपन होईल.

प्रश्नमंजुषा लिंक - https://forms.gle/g9P5gwQXZ9LQibD77

सर्वांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!