यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०२३ “शिकता शिकविता” या पुस्तकाला जाहीर करण्यात आला. या पुस्तकाचे लेखक नीलेश नीमकर यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. तसेच डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार वर्धा येथील दिपाली सावंत आणि पुणे येथील बाळासाहेब घोडे यांना जाहीर करण्यात आला.

चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

दिपाली सावंत, बाळासाहेब घोडे आणि शिकता शिकविता पुस्तकाचे लेखक निलेश निमकार यांना कुमुद बन्सल पुरस्काराबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!