द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक
दिनांक : 
वेळ : 

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फिनलँडचे दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.

जगप्रसिद्ध कादंबरीकार पॅदेर दोस्तोवस्की यांच्या ‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ या कादंबरी वरती हा चित्रपट आधारीत आहे. चित्रपटाचा नायक राईकायनेन हा एका खाटीकखान्यात काम करत असतो. तो अशा व्यक्तीचा खून करतो त्या व्यक्तीने आपल्या गाडीने नायकाच्या बायकोला जखमी केलेले असते. त्याचवेळी खूनाच्या प्रसंगी नायकाची एका तरूण मुलीशी गाठ पडते. पुढे काय होते ते पाहण्यासाठी आवश्य या. फिनलँडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकी कौरीस्माकी हे त्यांच्या सहज सुंदर, हलक्या फुलक्या, नर्मविनोदी परंतु तितक्याच चमत्कृतीपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रमुख पात्रे सर्व सामान्य फिनलँडर असतात. सर्व सामान्यांची सुख:दुखे:, त्यांच्या जीवनातील चढउतार ते तटस्थपणे नेटकेपणाने टिपतात. 1983 मध्ये फिनलँड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९३ मिनीटांचा आहे. 

‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.