महेश खंदारे

रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2022

आपल्या शालेय वयापासूनच नाटकाची आवड असणाऱ्या महेश यांनी पुणे विद्यापीठातील 'ललित कला केंद्रातून' नाट्य विभागातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या कामगिरीबद्दल पुणे विद्यापीठाने २०१९ साली नाटककार 'वसंत सबनीस सुवर्ण पदकाने' महेश यांना सन्मानित केले.

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असणारे महेश खंदारे यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर गेली चार वर्षे नाटय क्षेत्रात नट आणि दिग्दर्शक सातत्याने काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी १३नाटकांमध्ये अभिनय केला आहे तर १४ नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

विशेष बाब म्हणजे, कोविड काळात जेव्हा नाट्यगृहे बंद होती; रंगभूमी ठप्प पडली होती. तेव्हा महेश यांनी "नाटक दहा बाय वीस'" हा नवा उपक्रम सुरू केला होता. नाट्यगृहांव्यतिरिक्त इतर छोट्या जागांमध्ये नाटकं सादर करण्यास सुरुवात केली. या नाटकांचे शेकडो प्रयोग झाले. हाच उपक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी २०२२ साली 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर' तर्फे दिली जाणारी 'रंगसेतू फेलोशिप' महेश यांना मिळाली.

नाटय क्षेत्रांतील तुमचे योगदान असेच वृध्दींगत होत राहो, ह्या सदिच्छा!

यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी