अनिश सहस्त्रबुद्धे

युवा उद्योजक पुरस्कार
2022

मूळचे सोलापूरचे असणारे अनिश यांनी वयाच्या १५ व्या वर्षी क्रिकेट अंपायरिंगची परीक्षा क्लीअर केली. सर्वात लहान वयात परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी महाराष्ट्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी क्रिकेट अंपायर म्हणून त्यांनी जवळपास देशातील २४ राज्यांमध्ये अम्पायरिंग केली आहे.

सोलापूरची मिल बंद पडल्यानंतर अनिशच्या वडिलांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून एक छोटेसे पोळीभाजी सेंटर चालू केले. आपल्या कष्ट करणाऱ्या आई वडिलांकडे बघून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा र्निणय घेतला. त्यानंतर त्यांनी सोलापूर मध्ये एक रेस्टॉरंट चालू केले आणि कालांतरानं एक इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी देखील !

या सर्व गोष्टी करताना कॉलेज विद्यार्थ्यांसाठी अंदाजे हजारपेक्षा जास्त मोटिवेशनल सेशन्स, अनेक मल्टी नॅशनल कंपनीजसाठी कॉर्पोरेट ट्रेनर आणि कन्सल्टन्ट, अंदाजे ६ रिअल इस्टेट कंपनीजसाठी सोल सेलिंग पार्टनर, एक उत्तम निवेदक, वर्षाला अंदाजे ३०० पेक्षा जास्त इव्हेन्ट मॅनेज करणारा एक सक्षम इव्हेन्ट मॅनेजर म्हणून अनिश यांची ओळख आहे. सतत काहीतरी शिकत राहणे आणि स्वतःला अपडेटेड ठेवणे या ऍटिट्यूडने त्यांना येथपर्यंत आणून ठेवले आहे.

त्यांच्या कार्याची प्रशंसा म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मोस्ट मल्टिटास्किंग बिझनेसमन हा इंडिया लीडरशिप अवॉर्ड, दैनिक भास्करचा बेस्ट सेल्स ट्रेनर ऑफ इंडिया अवॉर्ड, दैनिक दिव्य मराठीचा माय महाराष्ट्र अवॉर्ड…! लाईव्ह रेडिओ स्टेशनमध्ये लग्न लावल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले आहे.

त्यांचे हे कार्य असेच वृद्धिंगत होत राहो, या सदिच्छा…!

यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी