शर्मिष्ठा भोसले

युवा पत्रकारिता पुरस्कार
2022

मुळच्या मराठवाड्यातील असणाऱ्या शर्मिष्ठा भोसले यांनी पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात झाली. सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, लोकसत्ता अशा माध्यमसमूहांसाठी त्यांनी काम केले आहे. गेली १२ वर्षे या क्षेत्रात त्यांचे सातत्याने काम चालू आहे. मराठी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या अरुण साधू स्मृती फेलोशिपवर सध्या शर्मिष्ठा यांचे काम चालू आहे.

संपूर्ण भारतभर फिरून विविध विषयांचा मागोवा त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून घेतला आहे. जसे की, मॉब लिंचिंगचे बळी ठरलेले कुटुंबीय, भीमा कोरेगाव दंगल, ट्रान्स समूहांच्या आयुष्याचा संघर्ष…! समाजातील वास्तव समजून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.

त्यांच्या या कार्याची प्रशंसा म्हणून देशपातळीवरचा लाडली मीडिया अवॉर्ड तसेच कॉ. अशोक मनोहर स्मृती पुरस्कार, प्रियांका डहाळे स्मृती पत्रकारिता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या पत्रकारितेची उंची अशीच वाढत जावो, त्यासाठी खूप सदिच्छा…!

शर्मिष्ठा भोसले यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी