कुलदीप माने

युवा पत्रकारिता पुरस्कार
2023

आपल्या तीन भावंडात सर्वात लहान असणारे कुलदीप माने यांनी आपले पत्राक्रीतेचे शिक्षण MGM college, छत्रपती संभाजीनगर येथून पूर्ण केले. आई वडिलांचे संस्कार आणि परिस्थितीच्या जाणीवेतून त्यांनी शिक्षणाची कास कधीच सोडली नाही. कुलदीप यांना लहानपणापासूनच वक्तृत्व कलेची आवड होती, याच कलेला जोडून एखादे क्षेत्र निवडायचे हे त्यांनी महाविद्यालयीन वयातच ठरवले आणि पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. पहिल्यांदा दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रासाठी अनेक वर्षे त्यांनी काम केले. सध्या ABP माझा या वृत्तवाहिनीसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. सांगली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शेती, गुन्हेगारी, एंटरटेनमेंट यासह सर्वच क्षेत्रातील बातम्यांचे त्यांनी घटनास्थळी जाऊन वृत्तसंकलन केले आहे.

आतापर्यंत या क्षेत्रात कार्य करत असताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१९ सालचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार, २०२० सालचा आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचाचा युवा पत्रकार पुरस्कार मिळाला.

कुलदीप यांनी पत्रकारिता क्षेत्रासह अनेक सामाजिक काम देखील करतात. सध्या ते सांगली जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्राचे जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत तसेच प्रेरणा फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम सुरु आहे. विशेष गोष्ट म्हणजे खानापूर या मूळ गावी त्यांनी शेतीच्या जागेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी स्टडी सेन्टर चालू केले आहे. याचा सगळ्यात जास्त फायदा कोविड काळात मुलांना झाला.

तुमचे पत्रकारिता क्षेत्रातले कार्य असेच वृद्धिंगत होत राहो, या सदिच्छा !

कुलदीप माने यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी