राजू केंद्रे

युवा सामाजिक पुरस्कार
2023

एका जिल्हा परिषद शाळेतून चालू झालेला राजू यांचा प्रवास थेट देशाच्या बाहेर त्यांना घेऊन गेला. हा मार्ग काही सोपा नव्हता. वसतिगृह नाही, मार्गदर्शक नाहीत, पुण्याची फर्ग्युसन सारखी महाविद्यालये आवाक्याबाहेरची होती. पुण्यात टिकून राहण्यासाठी राजू यांनी बीपीओचे काम केले परंतु वैदर्भिक भाषेमुळे जास्त काळ त्या ठिकाणी ते राहिले नाहीत. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळविला. झोपडपट्ट्या आणि वाड्या वस्त्यांवरील अनेक विद्यार्थ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि अवघ्या 20 व्या वर्षी राजूने 'एकलव्य' ची स्थापना केली. पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या आणि बहुजन समाजातील मुलांसाठी उच्च शिक्षणातील अडथळे दूर करण, हे त्या संस्थेचे ध्येय आहे.

लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स येथे राजू यांची निवड झाली होती. फेलो म्हणून निवड झाली. १७५४ पासून कार्यरत असलेल्या या जगप्रसिद्ध संस्थेत बेंजामिन फ्रँकलिन, कार्ल मार्क्‍स, अ‍ॅडम स्मिथ, विल्यम होगार्थ, नेल्सन मंडेला आणि चार्ल्स डिकन हे ‘फेलो’ राहिले आहेत. याआधी एसओएएस यूनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती. तसेच प्रतिष्ठित अशा ‘फोर्ब्स’ मासिकाने सुद्धा त्यांचा ३० प्रतिष्ठित युवकांच्या यादीत समावेश केला होता.

ग्रामीण भागात शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, आणि मुंबई येथून 30 हजारांहून अधिक पुस्तके गोळा करून राजू यांनी ग्रामीण भागात अनेक ग्रंथालये उभारली.

ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणाचे भविष्य आणि जीवन बदलणाऱ्या आधुनिक एकलव्यास पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!

राजू केंद्रे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी