यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई  विभागीय केंद्र अहमदनगर, आणि मा. सुप्रियाताई यांच्या संकल्पनेतुन साकारलेला "शेती कट्टा" या कार्यक्रमांचे १९ जानेवारीला (गुरूवारी) आयोजन आले असून वेळ सकाळी १० ते १२ असेल. यावेळचा शेती कट्टा या कार्यक्रम तालुका कर्जत आणि जामखेड असा संयुक्त असेल. यावेळी  "दुग्ध व मुरघास उत्पादन तंत्रज्ञान " विषय असून या विषयावरती तज्ञ मार्गदर्शक  डॉ . राहुल देसले सहयोगी प्राध्यापक, पशुविज्ञानदुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, श्री. ज्ञानेश्वर पवार कृषि पदवीधर कृषि भुषण, प्रगतिशील शेतकरी मु. पो. पुनतगाव, ता. नेवासा आणि डाॅ. हरी मोरे प्राचार्य, कृषि महाविद्यालय सोनई मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे ठिकाण श्री. हणुमंत पवार वस्ती, मु. पो. टाकळी खंडेश्वरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर आहे. सदर शेती कट्टयाचे आयोजन प्रशांत पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - अहमदनगर