मुंबई: या तीन अक्षरांत जणू विश्व सामावलं आहे. 'वसुधैव कुटुंबकम्'चं मूर्तरूप म्हणजे मुंबई. अनेक नावांनी गौरवली जाणारी आणि तितक्याच शिव्याशाप उरापोटात दडवून माणसांना झेलणारी मुंबई. ही महानगरी एका अजस्त्र पर्वतासारखी आहे किंवा असं म्हणूया, मुंबई आणि आपला संबंध म्हणजे हत्ती आणि आंधळ्यांसारखा आहे. ज्याची-त्याची मुंबई निराळी. पण या शहरावर प्रेम मात्र निर्विवादपणे आहे. याच प्रेमापोटी घडवलेलं हे मुंबई दर्शन-
"दास्तान-ए-बड़ी बांका"
दास्तांगोई म्हणजे उर्दू मधील कथाकथन !
संकल्पना, संकलन, दिग्दर्शन आणि सादरीकरण- धनश्री खंडकर, अक्षय शिंपी
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
शनिवार,२५ डिसेंबर २०२१ वेळ: सायंकाळी ७.०० वा.
प्रयोगस्थळ :रुक्मिणी सभागृह,एमजीएम परिसर,औरंगाबाद
प्रवेश सर्वांसाठी खुला !
आयोजक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी मिशन व अभ्युदय फाउंडेशन

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद