यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय " ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त - प्रश्नमंजुषा” आयोजित करण्यात आली आहे.

प्रश्नमंजुषा लिंक - https://forms.gle/ACakvxHaDrBs7B3Q7

ही प्रश्नमंजुषा रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. प्रश्नमंजुषा तीन गटांमध्ये घेण्यात येईल.

१-शालेय गट-इयत्ता ५ ते १० वी.
२-महाविद्यालयीन गट - इयत्ता अकरावीपासून पदवीपर्यंत.
३-खुला गट- या गटात शिक्षक,पालक,अभ्यासक व इतर सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात.

या तिन्ही गटासाठी १८५७ ते १९४७ आणि १९४७ ते १५ ऑगस्ट २०२३ पर्यंतचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड यावर भारताच्या जडणघडणीच्या विविध टप्प्यांवर आधारित प्रश्न असतील. स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजांसोबतचा संघर्ष, त्यातील महत्त्वाच्या घटना, विविध मतप्रवाह, नेतृत्व, सामाजिक सुधारणा, त्या काळातील साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, शिक्षण इत्यादी बाबतीत झालेल्या सुधारणा. स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेले संस्थानिकांचे विलीनीकरण, भाषेवर आधारित प्रांतरचना, भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण, भारताचे जगातील स्थान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, अर्थव्यवस्था, रोजगार, वाढती लोकसंख्या, विषमता आदी विषयांवर आधारित प्रश्न यात विचारले जातील.

प्रश्नमंजुषेविषयी सूचना:

१) परीक्षेची लिंक निर्धारित वेळेपासून २४ तास खुली राहील.
२) उपरोक्त विषयावर प्रत्येकी १ गुणाचे १५ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. मराठी आणि इंग्रजी या दोनपैकी एका माध्यमातून ही परीक्षा देता येईल.
३) प्रश्नपत्रिका पहिल्या भागात नाव, फोन नंबर, जिल्हा इत्यादी माहिती भरल्यानंतर next बटन क्लिक केले की दुसरा भाग दिसेल. या भागात प्रश्नपत्रिका दिलेली असून सर्व प्रश्न सोडवल्यानंतर submit हे बटन क्लिक करावे.
४) महत्त्वाचे:- ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी फक्त एकच संधी दिली आहे त्यामुळे उत्तराची खात्री करूनच सबमिट बटन दाबावे.
५) सबमिट बटन क्लिक केल्यावर आपल्या प्रतिसाद नोंदवला गेला आहे हा संदेश आणि त्याखाली view score हे बटन दिसेल.
६) एकाहून अधिक प्रतिसाद प्राप्त झाल्यास सर्वात आधी दिलेल्या प्रतिसादाचे गुण ग्राह्य धरले जातील.
७) गुण समान झाले तर ज्या स्पर्धकांनी पेपर आधी सबमिट केला अशांचा प्राधान्याने विचार करून विजेते निश्चित केले जातील.
८) प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ईमेलवर मिळेल.
त्यासाठी ० ते ५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. ५ दिवस उलटून गेल्यावर संजना पवार - 8291416216 यांच्याशी संपर्क साधावा.
९) महत्त्वाचे: प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गुगल फॉर्ममध्ये अचूक ईमेल लिहिणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र पाठवण्याची प्रक्रिया स्वयंचलित असल्यामुळे ईमेलमध्ये त्रुटी असल्यास सर्टिफिकेट मिळणार नाही. याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
१०) या प्रश्नमंजुषेतील प्रथम तीन स्पर्धकांची नावे सोमवार दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी शिक्षण विकास मंचाच्या सर्व व्हाट्सअप समूहात प्रसारित केली जातील.त्यांना ग्रंथभेट व गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]