ति. विठामाता स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या मातोश्री स्व. ति. विठामाता यांची पुण्यतिथी १८ ऑगस्टला प्रत्येक वर्षी आवर्जून साजरी केली जाते. स्वर्गीय यशवंतरावांचे ति. मिठामाताच्यावर फार मोठी श्रद्धा होती. स्व. यशवंतरावांच्या जडणघडणीत ति. विठामातांचा फार मोठा हात होता. स्व. यशवंतराव मातृभक्त होते. स्वर्गीय विठामातांच्या स्वउचित ओव्या संस्मरणीय आहेत. सौ. वेणूताईनी या ओव्या लिहून ठेवल्या आहेत. प्रत्येक वर्षी १८ ऑगस्ट ला ति. मिठामातांचा स्मृतिदीन विरंगुळा व सौ. वेणूताई चव्हाण ट्रस्टमध्ये साजरा केला जातो. कराड विभागीय केंद्राचे अध्यक्ष व आमदार बाळासाहेब पाटील यांनी विरंगुळ्यात व सौ. वेणूताई स्मरकातील ति. विठामातांच्या फोटोला पुष्पहार स्मर्पित करुन श्रद्धांजली वाहिली. श्री. मोहनराव डकरे (सचीव) व सर्व कर्मचारी वर्गानेही आपली आदरांजी वाहिली. विठामाता विद्यालयातही श्रद्धांजली वाहण्याचा भावपूर्ण कार्यक्रम झाला.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - कराड