मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दिवंगत शरद काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांनी 'भारत आणि जग : सद्यःस्थिती' या विषयावर विचार मांडले. सध्या चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या शेजारील देशांशी भारताचे संबंध ताणले गेले असल्याने देशाने आपल्या परराष्ट्र धोरणाचा नव्याने आणि गांभीर्याने फेरविचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच देशातील तरुण पिढी हुशार व सुशिक्षित असली, तरी त्यांच्यापर्यंत जागतिक घडामोडींची सविस्तर माहिती पोहोचत नसल्याने तरुणांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे सजगतेने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अजित निंबाळकर यांनी भूषवले होते.

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
19 ऑक्टोबर 2024