कोरोनाच्या काळात गेल्यावर्षी व यावर्षीही १००० च्या वर कोरोनामुळे मृत झालेल्या जात,पात, पंथ,धर्म न मानता मानवेतचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांचे मोफत अंत्यसंस्कार करणाऱ्या नांदेड येथील हॅप्पी क्लबच्या २२ युवकांचा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या कार्याध्यक्ष संसदरत्न खासदार #सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गौरव करण्यात आला. यावेळी हॅप्पी क्लबने त्यांच्या या पवित्र भावनेने सुरू केलेल्या कामाची माहिती दिली. नांदेड शहरातील लावारीस लोकांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे असेल,किंवा दवाखान्यात मोफत इलाज करणे असेल किंवा त्यांची सेवा करणे असेल या कार्यात हॅप्पी क्लबचे 22 सदस्य कर्तव्याच्या भावनेने कार्यरत असतात हे सांगताना त्यांना व उपस्थित सर्वांना मोठा आनंद वाटला.
कोरोनाच्या गेल्यावर्षीच्या पहिल्या,दुसऱ्या लाटेत त्यांनी कोरोनामुळे मृत पावलेल्या जवळपास 1000 लोकांवर त्यांच्या  धर्मानुसार अंत्यसंस्कार केले स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी मानवतेचे पुजारी म्हणून सेवा केली याचा त्यांना खूपच अभिमान वाटतो असेही हॅप्पी क्लबचे शोएब भाई म्हणाले. त्यांनी शहरातील गल्ली बोळ्यातील आजारी व अत्यावस्थ लोकांना तात्काळ इलाजासाठी नेण्यासाठी बाईक अंबुलन्स हा उपक्रम सुरू केल्याची माहिती दिली याचे उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या गोदावरी समूहाच्या अध्यक्षा सौ.राजश्रीताई पाटील यांनी हॅप्पी क्लबच्या कामाचे व त्यांच्या टीमचे कौतूक करत आगामी काळात कोणत्याही अडचणीस मदत करण्याचे आश्वासन दिले आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या कार्याध्यक्ष संसदरत्न सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिनानी अस पवित्र भावनेने काम करणाऱ्या युवकांचा गौरव करण्याचा सोहळा आयोजित केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक विभागीय केंद्र नांदेडचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित जेष्ठ आकाशवाणी पत्रकार आणि सामाजिक वास्तववादी अभ्यासक आनंद कल्याणकर,इंजी.शिवाजी नरवाडे,विमा विकास अधिकारी सुधाकर आडकीने,डॉ.मनोरमा चव्हाण यांनी ही कार्यक्रमा दरम्यान आपले विचार व्यक्त करून हॅप्पी क्लब व विभागीय केंद्रास शुभेच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय केंद्राचे अध्यक्ष माजी मंत्री कामलकिशोर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे, सदस्य शिवानंद सुरकूटवार,सदस्या डॉ.मनोरमा चव्हाण यासह कार्यकारिणी यांनी परिश्रम घेतले. सौरभ करंडे, शिवहारी गाढे,रवी भोकरे,गणेश तादलापूरकर,प्रा.राजेश क्षीरसागर,संदीप तळेगावकर यांनचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.नामदेव दळवी यांनी केले तर आभार विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे यांनी मानले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नांदेड