नाट्यकला जीवनात आनंद निर्माण करणारी कला - विश्वास ठाकूर

नाशिक : कुठलीही कला ही जीवन जगण्यासाठी आनंददायी असून त्यातून मिळणारा निखळ आनंद हा ऊर्जा देणारा असतो. बालनाट्य शिबिरातून मुलांमधील सुफ्त गुणांना व्यासपीठ मिळत असते. त्याचबरोबर त्यांच्यातील व्यक्तीमत्त्व विकासाला नवा आयाम मिळत असतो. आजच्या आभासी जगात नाट्यकला ही वास्तवावचे खरे प्रश्‍न मांडत असते. त्यातून समाजाशी थेट संवाद होतो. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार 22 ते शनिवार 28 एप्रिल 2018 रोजी ‘बालनाट्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. समारोप प्रसंगी श्री. विश्वास ठाकूर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, चांगल्या पुस्तकांचे वाचन हे जीवनाला दिशा देत असते व त्यातून चांगूलपणाचा शोध घेण्याची सवय लागते. त्यासाठी आत्मचरित्र, चरित्रांचे वाचन करावे व त्यांचा आदर्श घ्यावा. अभिनय ही कला असून त्यातून मिळणारा आनंद नवे शिकविणारा असतो. प्रत्येकात कलावंत दडलेला असतो आणि त्याचा शोध घेण्याचे काम अशी शिबीरे करतात
समारोपाप्रसंगी मुलांनी दिवाकरांच्या नाट्यछटा, समूहनृत्य, नाटिका सादर केल्या व कलाविष्कार सादर केले. याप्रसंगी शिबिरार्थींना प्रमाणपत्रे विश्वास ठाकूर यांचे शुभहस्ते देण्यात आले. याप्रसंगी नाट्यलेखक राजा ठाकूर उपस्थित होते. शिबीरार्थींनी व पालकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक