यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्यावतीने "राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४" या विषयावर शुक्रवार, दिनांक ३१ मे २०२४ या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत ऑनलाइन शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला आहे.

नवीन शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणीच्या दृष्टीने इयत्ता तिसरी ते बारावीसाठी अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा 'राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)-२०२४'चा मसुदा राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र, राज्य पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. हा मसुदा आपणांस पुढील संकेतस्थळावर पहाता येईल.

https://www.maa.ac.in/index.php?tcf=scf_se

हा आराखडा जनतेच्या अभिप्रायांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. दिनांक ३ जून २०२४पर्यंत या आराखड्यावरील सूचना एसीईआरटीकडे पाठवायच्या आहेत. हे औचित्य साधून आपण या राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षण कट्टयाचे आयोजन केले आहे. हा शिक्षण कट्टा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे, मा. धनवंती हर्डीकर माजी विद्यासचिव, बालभारती यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.

या कट्ट्यावर शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना सहभागी होता येईल. ज्यांना झूम मीटिंगमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी पुढील लिंक वर जाऊन गुगल फॉर्म भरून नोंदणी करावी.

https://forms.gle/FvTSVSdtAe7egKiXA

फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर व्हॉट्सअप लिंक येईल, ती क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा. पुढील सूचना व्हॉट्सअप ग्रुप वर दिल्या जातील.

सदरील शिक्षण कट्टा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्कध्वनी

संजना पवार - 82914 16216

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
वेळ : 
04:00
ते
06:00