आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' १२ डिसेंबर २०२१ वर्षांपासून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत कृषी, साहित्य आणि शिक्षण या तीन विभागात शरद पवार इन्स्पायर फेलोशिप देण्यात येते. या फेलोशिपच्या माध्यमातून या तिन्ही क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते.

चव्हाण सेंटरच्या निवड समितीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८० तर ‘शरद पवार साहित्य फेलोशिप' साठी १२ व शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन साठी ४० अशा एकूण १३२ फेलोंची निवड केली आहे. आदरणीय शरद पवार साहेब आणि मा. डॉ. सी. डी. मायी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा फेलोशिप प्रदान सोहळा दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्वांनी या फेलोशिप प्रदान सोहळ्यास उपस्थित राहावे.

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
11 डिसेंबर 2022
वेळ : 
01:30
ते
04:30
ठिकाण : 
यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१