महिला या समाजाच्या महत्त्वाचा घटक आहेत प्रा डॉ नभा काकडे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर आणि ए  आर डी शेख प्रतिष्ठान मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा डॉ नभा काकडे महिलांना मार्गदर्शन करता  होत्या याप्रसंगी पूर्वीपासून अगदी आदिवासी वर्गात देखील महिलांचे स्थान मोलाचे आहे सुई दोरा विणकाम त्याच बरोबर शेतीचं पहिलं अवजार हे देखील महिलांनीच बनवलेला आहे तेव्हा महिलांना मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं तरीदेखील प्रगती हि महिलांनीच केली आहे सरपंचापासून ते नासा पर्यंत महिलांनी भरारी घेतली आहे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई ताराबाई या आपल्या आदर्श आहेत सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून नवतंत्रज्ञान देखील अवगत करण्यात पारंगत झाले आहेत त्यामुळे महिलांनी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी प्रगतीसाठी चळवळीसाठी पुढे येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा डॉ नभा काकडे यांनी महिला दिनानिमित्त केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ राजश्री राजन पाटील उपस्थित होत्या नुकत्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात पहिल्या नगराध्यक्ष म्हणून माड्याच्या सौ मीनल साठे या निवडून आल्या आहेत त्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला या कार्यक्रमास प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे सदस्य श्री दत्ता गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन दोन्ही प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्या सदस्या श्रीमती शाहीन शेख यांनी केले याप्रसंगी युवती आणि महिलांसाठी प्रोत्साहनपर विविध गुणदर्शनाचा स्पर्धा संपन्न झाल्या आणि त्याचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर