बालपणापासूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण आणि कुटुंबातील जबाबदारी ही यशवंतराव चव्हाण यांच्यावर आलेली होती आई विठाबाईचे संस्कार आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी लागणारे कौशल्य यातूनच यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व देशाला आणि महाराष्ट्राला लाभो शकलं. गरीबी पाचवीला पुजलेली असल्यामुळे सत्तेची कवाड जेव्हा यशवंतरावांना लाभली तेव्हा त्यांनी गोरगरिबांसाठी योजना आणण्याचा निर्धार केला त्यामुळेच बहुजन समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम करणयासाठी शिक्षणाच्या प्रवाहात आली याचं श्रेय यशवंतरावांना जात म्हणून याच क्षेत्रात स्वतःला वाहून घेतलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पाठीशी यशवंतराव उभे राहिले गरिब हरिजन गिरिजना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम यशवंतरावांनी बालपणापासूनच सुरू केलं होतं शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच स्वातंत्र्याच्या चळवळीत यशवंतराव सहभागी झाले होते त्यामध्ये त्यांचं मोठे योगदान असून स्वातंत्र्याच्या काळात त्यांना अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला आणि त्यातून देखील यशवंतराव घडत गेले साहित्यिक कलावंत लेखक आणि खेळाडू यांच्याबद्दल यशवंतरावांना नितांत आदर होता रसिक मनाचे तसेच खंबीर धैर्यवान कर्तुत्ववान आणि बुद्धिमान नेता म्हणून आजही त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते माणूस म्हणून यशवंतराव चव्हाण फार मोठ्या मनाचे होते आपल्या प्रगल्भ विचारांमुळे सतत देशाचा आणि महाराष्ट्रा विकासाचा ध्यास घेतलेले यशवंतराव लोकनेता म्हणून आजही नव्या पिढीला मार्गदर्शक आहेत सातत्याने प्रबोधन विचारांची एक वीण ग्रामीण महाराष्ट्राचा आकृतिबंध विकास याबाबतचे चिंतन यशवंतराव सातत्यानं करत होते सामाजिक राजकीय साहित्य कला संसदीय कार्य आणि राष्ट्र अभिमान असलेल्या यशवंतरावांनी अनेक उच्च पदे भूषवली परंतु समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास कसा करता येईल याचा ध्यास मात्र यशवंतरावांना शेवट पर्यंत होता अत्यंत शालीन नम्र आणि मनाने हळवे असलेले यशवंतराव चव्हाण यांचे अनेक पैलू आहेत आणि प्रत्येक पैलूवर बोलायचे असल्यास आपणास वेळ पुरणार नाही समग्र यशवंतराव समजून घेण्यासाठी त्यांच्यावर असलेले साहित्य आणि स्वातंत्र्य चळवळीपासून ते उच्च पदापर्यंत ते कसे पोहोचले याचे चिंतन जरी आपण केले तरी यशवंतराव चव्हाण आपण समजून घेऊ शकतो असे प्रतिपादन प्रा डॉ शिवाजीराव देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या एकशे नव्या जयंतीनिमित्त केले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मोडनिंब तालुका माढा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या एकशे नव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा डॉ शिवाजीराव देशमुख यांनी विस्तृत विवेचन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक दत्ता गायकवाड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सदस्य डॉ सौ निशिगंधा माळी मोडनिंब राष्ट्र चयृसाहित्य परिषद शाखा मोडनिंबचे सरपंच ,अध्यक्ष प्रा संतोष लोकरे प्रमुख कार्यवाह सुरेश कुमार लोंढे यांच्यासह पंचक्रोशीतील महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक रसिक यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी मोडनिंब चे नागरिक उपस्थित होते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या एकशे नव्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यास उत्तम प्रतिसाद लाभला त्याचे पारितोषिक वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष कष्ट घेतले आहेत

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]