सर्वांना सस्नेह निमंत्रण !

'सिंहासन' ४४ वर्षांचे...!

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने डॉ. जब्बार पटेल यांच्या सन्मानार्थ 'सिंहासन' चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हे स्क्रीनिंग होणार आहे. १९७९ साली प्रदर्शित झालेला 'सिंहासन' चित्रपट लेखक अरुण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या दोन कादंबऱ्यांवर आधारित असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल होते तर पटकथा विजय तेंडुलकर यांची होती. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर मा. शरदचंद्रजी पवार, मा. जब्बार पटेल व मान्यवरांचे चर्चासत्र देखील होणार आहे.

चव्हाण सेंटरच्या वतीने डॉ. जब्बार पटेल यांच्या सिनेक्षेत्रातील प्रदीर्घ अभिमानास्पद कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांच्या सर्व चित्रपटांचे स्क्रिनिंग पुढील वर्षभरात करण्यात येणार आहे.

प्रवेश विनामूल्य...!

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
11 एप्रिल 2023
ते
11 एप्रिल 2023
वेळ : 
05:00