यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने योगेंद्र यादव यांचे ‘रीक्लेमिंग द रीपब्लिक: द चॅलेंज ऑफ २०२४’ या विषयावर नेहरू सेंटर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. राजन वेळूकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगेंद्र यादव यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व प्रश्नांचे निरसन केले.

चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले तर पूर्व वळसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने केले होते.

वीडियो गॅलरी