खा. सुप्रिया सुळे यांची माहिती

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत आणखी एकदा वाढवण्यात आली आहे. आता ही मुदत २० मे २०२२ ही करण्यात आली असल्याचे चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी कळवले असून ज्यांनी अद्यापही अर्ज केले नसतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कृषी, साहित्य, क्रीडा, सामाजिक कार्य, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज करायचे राहून गेले असल्यास पुढील पंधरा दिवसात केव्हाही अर्ज करता येणे आता शक्य होणार आहे.

त्यासाठी आणि पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन आले असून या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सुळे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी
+919404764176 या मोबाईल क्रमांकावर किंवा
हा ईमेल पत्ता स्पॅमबॉट्सपासून संरक्षित केला जात आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे. या इमेलवर संपर्क साधावा.