अंबाजोगाई- दि. २१ (वार्ताहर): यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई- जिल्हा केंद्र बीडच्या वतीने बीड जिल्हा स्तरीय भीमगीत व शिवगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. अंबाजोगाई येथील वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला येथे झालेल्या या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित गाणी ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले.

या स्पर्धेमध्ये प्रथम- बळीराम उपाडे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषक पटकावले. पाच हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय क्रमांक महेश गीत्ते यांनी तीन हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह तर तृतीय क्रमांक डॉ. राजेश इंगोले यांनी रोख दोन हजार व स्मृतीचिन्ह असे पटकावले. उत्तेजनार्थ पुरस्कार कुमारी आकांक्षा अहिरे आणि प्रदीप चोपणे या दोघांना एक हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपात देण्यात आला.

नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, अनिकेत लोहिया, दगडू दादा लोमटे, डॉ. नरेंद्र काळे, शंकरअण्णा उबाळे, डॉ धाकडे, अभिजीत जोंधळे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या यशाबद्दल आ. उषाताई दराडे, अमर हबीब, ऍड प्रज्ञाताई खोसरे, अतुल कुलकर्णी, सौ.सृष्टी सोनवणे, प्रा. अखिला गौस, सौ. कावेरी नागरगोजे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले. परीक्षक म्हणून खंदारे सर, सुरवसे सर व देशपांडे मॅडम यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. अनंत कांबळे आणि श्री. बालाजी शेरेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. सुरेश पाटील, प्रकाश बोरगावकर, भीमाशंकर शिंदे, महादेव माने, रणजीत मोरे, आशिष जाधव, गोविंद टेकाळे, विलास काचगुंडे यांनी परिश्रम घेतले.